राफेलबद्दल बोलू काही ?
गेल्या काही महिन्यांपासून कोणी राफेल तर कोणी रफायल आणि आणखी बरच काहीतरी पुन्हा पुन्हा उच्चारताना बघायला मिळतय तसेच ह्या सगळ्या गोष्टी आता इतर राजकीय पक्ष पुन्हा प्रसारमाध्यमांकडे हा विषय रवंथ करण्याच्या उद्देशाने भिरकावताना दिसताहेत पण त्याच बरोबर हा मुद्दा कसा जास्तीत जास्त लोकांसमोर येईल ह्याचा यशस्वी-अयशस्वी प्रयत्न करताना आपल्याला ते पाहायला मिळतात. याचं मुख्य कारण कदाचित आगामी लोकसभा निवडणूक असायाच्या शंकेला पूर्ण वाव आहे. मूळ मुद्द्याची सुरुवात हि यूपीए सरकारच्या काळात झाली.राफेल हे एक अत्याधुनिक दोन इंजिन असलेले फ्रेंच लढाऊ विमान आहे ज्याची गणना जगातल्या सर्वोत्तम अशा जेट विमानांमध्ये केली जाते. यूपीए(मनमोहन सिंग सरकार) च्या कार्यकाळात झालेल्या हा करार असा कि एकूण १२६ विमानांची प्रत्येकी ५२६ कोटी दराने खरेदी करून त्यापैकी १०८ विमानांची निर्मिती हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड तर १६ विमानांची निर्मिती हि फ्रांस करणार होते पण नंतरच्या काळात सत्तांतर झाल्यावर ह्या करारात थोडा(कि खूप?) बदल करण्यात आला. एनडीए(मोदी सरकार) कडून करण्यात आलेल्या करार...