न्यायव्यवस्थेच्या भावी संरक्षकांवरच वेळोवेळी अन्यायसदृश्य परिस्थिती का ?
कालपरवाच एका मित्राने परीक्षेच्या अनपेक्षित वेळापत्रकाचा बॉम्ब एका व्हाट्स अप ग्रुप वर टाकला, त्यामुळे प्रथम वर्षात तीनवर्षीय(एल.एल.बी.) कायद्याच्या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हृदयाचे ठोके अचानकच वाढले असतील यात दुमत नाही. असं व्हायचं मुख्य कारण हे कि विधी अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया खरे तर नुकतीच म्हणजे गेल्या दहा पंधरा दिवसांच्या आधी, दिवाळीच्या अलीकडे संपली आहे. दिवाळीच्या सुट्ट्या घालवत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मात्र पाठ्यक्रम शिकवून पूर्ण झाला नसताना परीक्षेचे वेळापत्रक जाहीर होण्याच्या लगेचच १७ दिवसानंतर परीक्षा हे काही पचनी पडण्यासारखंच नाहीये.नंतर आणखी थोडी विचारपूस केल्यावर कळलं कि ती व्हायरल झालेल्या वेळापत्रकाची पी.डी.एफ. फाईल औपचारिक पद्धतीने संकेतस्थळावर उपलब्ध नव्हती. म्हणजेच व्हाट्स अप सारख्या समाजमाध्यमात पसरत असलेली ती फाईल खोटी असल्याच्या अविर्भावात असल्यामुळे, विद्यार्थ्यी पेचातून सुटल्याने, सुस्कारा सोडत नाहीत तेवढ्यात लगेचच पुढच्या दिवशी ती फाईल औपचारि...